टुडे प्रवाह – राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावतीत विद्यार्थ्यांसह विविध शिक्षण संघटनांच्या रोषाचा बुधवारी सामना करावा लागला. अखिल भारतीय विद्यार्थी संघ (एआयएसएफ), अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच शिक्षण संघर्ष संघटनेने अमरावतीमध्ये विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने केली.

कंपन्यांना शाळा सुरू करण्यास मुभा देण्याचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १३५४ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या खासगीकरणाचा निर्णयाचा विरोध करत एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांचे वाहन अडवले. शिक्षणाच्या कंपनीकरणाचा विरोध करत एआयएसएफच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. निवड प्रक्रियेनुसार विद्यार्थी संघाच्या निवडणूका रद्द करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) निवेदन देण्यात आले. खुल्या पद्धतीने विद्यार्थी संघाची निवडणूक घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्यवृत्ती अर्ज भरताना येणारी अडचण दूर करण्याची मागणी करत डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. स्वयंअर्थसाहाय्य शाळा स्थापना व विनिमय अधिनियम २०१२ मध्ये आणखी सुधारणा करण्याच्या मागणीला घेऊन शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने पंचवटी चौकात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 20 =