एसबीआयने ‘ही’ सेवा केली निशुल्क

0
826

 टुडे प्रवाह –  स्टेट बँक ऑफ इंडियाने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केले आहे. ग्राहकांना ही सेवा उद्यापासूनच मिळणार आहे.

आयएमपीएस ही तात्काळ आंतरबँक इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण सेवा आहे. ही सेवा मोबाइल तसेच इंटरनेट बँकिंग अशा दोन्ही प्रकारच्या आॅनलाइन पद्धतीने वापरता येते. एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम आयएमपीएसमार्फत पाठविण्यासाठी लागू असलेल्या सेवाकरासह पाच रुपयांचे शुल्क एसबीआयकडून आकारण्यात येत होते. हे शुल्क आता लागणार नाही.

ऑनलाईन सेवेचा वापर करताना शुल्क कमी लागणार आहे. छोट्या तिकीट आकारातील आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम आयएमपीएसवरून हस्तांतरित करण्यासाठी लावण्यात येणारे शुल्क रद्द केले आहे. जीएसटीनंतर बदललेल्या परिस्थितीत बँकेने शुल्क रचनेचा आढावा घेतला. यावेळी हे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे.

तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने नॅशनल फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाईम ग्रॉस डेटलमेंट (आरटीजीएस) शुल्कात ७५ टक्के कपात केली आहे. नव्या शुल्काची अंमलबजावणी १५ जुलैपासून होणार आहे.

एक हजार रुपयांपर्यंतच्या हस्तांतरण रकमेवर आता कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र, एक हजार ते एक लाख रुपये पाठविण्यासाठी पाच रुपये शुल्क लागेल. एक लाख ते दोन लाख रुपयांची रक्कम पाठविण्यासाठी १५ रुपयांचे शुल्क लागेल. या सर्व व्यवहारांवर १८ टक्के सेवाकर लागेल, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × three =