टुडे प्रवाह  महापालिका विधी समितीने विषय पत्रिकेवरील डॉक्‍टर पदोन्नतीचा विषय तहकूब करुन ऐनवेळच्या विषयांना तत्काळ मंजुरी दिल्या आहेत. यापुढे स्थायी, विधीसह अन्य विषय समितीमध्ये नगरसदस्यांचे ऐनवेळेचे कुठलेच विषय घेण्यात येवू नयेत. जर कुठल्याही समितीत ऐनवेळेचे विषय घेवून मंजुरी दिल्यास याबाबत शिवसेनेकडून न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना इशारा दिला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या विधी समिती सभापतींनी समिती सभेच्या अजेंड्यावर असलेले डॉक्‍टर पदोन्नतीचे दोन्ही विषय तहकूब केले. मात्र, समिती नगरसदस्यांकडून ऐनवेळेचे 6 विषय विधी सभेपुढे ठेवण्यात आले होते. त्यातील सहा पैकी पाच ऐनवेळचे विषय मंजूर करण्यात आले.

वाकड येथील रस्त्याचा स्थळ बदलायचा विषय आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विधी समितीकडे आला. त्या विषयाला डावलण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, यापुढे स्थायी, विधी व अन्य विषय समित्यांमध्ये कुठलाही ऐनवेळेचा विषय आणू नये किंवा मंजूर करु नये. जर यापुढे ऐनवेळेचे विषय मंजूर केल्यास “शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल. तसेच स्थायी, विधी समितीसह बैठकीत सुधारणा न झाल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल, असाही इशारा कलाटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − ten =