सुनील तटकरे यांनी उडवली खिल्ली

टुडे प्रवाह – भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र राहतात आणि एकमेकांवर आरोप करतात, असा संदर्भ देत कमळाबाईच्या हातात सूत्रे आल्यानंतर धनुष्यबाणाने लोटांगण घातले आहे, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिंचवड येथे बोलताना उडवली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, की भाजपची सत्ता आहे, मात्र शिवसेना फरफटत चालली आहे. यापूर्वीच्या काळात त्यांच्यातील युतीत शिवसेना ‘मोठा भाऊ’ होती. ‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेकडून भाजपची खिल्ली उडवली जात होती. आता दिवस पालटले आहेत. चार दिवस सासूचे झाले, आता चार दिवस सुनेचे आहेत. कमळाबाईने सूत्रे हाती घेतली असून धनुष्याने लोटांगण घातले आहे, असे ते म्हणाले. बाराही महिने कष्ट करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतक ऱ्यांना, सामान्य जनतेला शरद पवारांचा आधार वाटतो आहे. आजही, ७७ वय असतानाही पवार शेतक ऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर फिरत आहेत.

 मुख्यमंत्री कर्जमाफीनंतर रोज नवीन परिपत्रक काढत आहेत. मुंबईत शेतकरी असल्याचा शोध त्यांनी लावला आहे. सरकारच गोंधळलेले आहे. राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहिलेला नाही. आगामी काळात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असा सल्लाही तटकरे यांनी या वेळी दिला.

अजित पवारांकडे ‘उद्याचे नेतृत्व’ म्हणून पाहिले जाते. सत्तेत नसतानाही अजित पवारांसाठी गर्दी उसळते, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसते. ते मुख्यमंत्री व्हावेत, असे सर्वाना वाटते, त्यासाठी संघटना मजबूत व्हायला हवी, कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घ्यायला हवेत. सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + thirteen =