किशोर कुमार यांचे घर पाडणार!

0
883
टुडे प्रवाह –  हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात गायक, नट, हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार यांचे घर पाडण्याची नोटीस खंडवा महापालिकेकडून पाठवण्यात आली आहे. किशोर कुमार यांचे हे घर जवळपास १०० वर्ष जुने आहे. 

खंडवा महापालिकेने त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. घराची दुरावस्था झाली असून ते कधीही कोसळू शकते. त्यामुळे या घरात राहणे सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. हे घर लवकर खाली करणे गरजेचे आहे. दिलेल्या वेळेत हे घर खाली केले नाही तर घर पाडण्यात येईल, असे महापालिकेने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. महापालिकेने किशोर कुमार यांच्या घराबाहेर ही नोटीस चिकटवली आहे. कधी काळी या घराच्या अंगणात किशोर कुमार यांनी आपले भाऊ अशोक आणि अनूपसोबत हसत खेळत आपले बालपण घालवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × one =