घर बचाव समितीचा प्राधिकरणाच्या अटी-शर्तीं विरोधात लढा

0
85

 ट्युडे प्रवाह  – घरे नियमितीकरणासाठी नवनगर विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी, शर्तीं आणि खर्च नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे रिंगरोडबाधित व प्राधिकरणातील करांचा प्रश्न जैसे थे राहणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अटी-शर्तीं विरोधात लढा उभारण्याचा इशारा रिंगरोड बाधितांच्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने दिला आहे.  चार दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला समन्वयक राजश्री शिरवळकर, प्रतिभा कांबळे,नयना नारखेडे, भाग्यश्री सावंत, अर्चना मेंगडे, सुनिता फुले, सुरेखा बहिरट, मनीषा घाडगे, चंद्रकला नवाडे, ज्योती वायकर, विद्या पाटील, संगीता सोनावणे, धनाजी येळकर, मनोहर अण्णा पवार, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, राजेंद्र देवकर, अमोल पाटील, शिवाजी पाटील, अतुल वर्पे, दत्ता चिंचवडे, देवेंद्र भदाणे, मनोज पाटील, सुदर्शन भराटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, गणेश सरकटे आदी उपस्थित होते.

शासनाच्या निर्णयात व प्राधिकरणाच्या धोरणात आर्थिक दुर्बल घटकांचा विचार केलेला नाही. अर्धा, एक गुंठ्यासाठी अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी चारपट दंडासह उपकर, विकासशुल्क, सुरक्षा ठेव, बांधकाम स्क्रुटिनी, पसेज, आर्किटेक्‍चर खर्च, मोजणी शुल्क अशा प्रकारचे दंड भरावे लागणार आहेत. त्याचा खर्च लाखो रुपयांमध्ये जाणार असून ते सर्वसामान्य कुटुंबांना मुळीच परवडणारे नाहीत. संपूर्ण शास्तिकर भरल्याशिवाय बाधितांना नियमितीकरनाचा अर्जही करता येणार नाही. त्यामुळे शास्तीकराच्या विरोधात ज्यांनी सत्तेत येण्यासाठी रान पेटवले,तेच बाधितांच्या गळ्यातील शास्तीचा फास आवळत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + twenty =