जळगांव बारी पंच मंडळातर्फे १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
938

 टुडे प्रवाह =  बारी पंच मंडळातर्फे दहावी आणि बारावी तसेच विविध पदविकांमध्ये यशस्वी झालेल्या १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रविवार दि.१६ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा होते. नगरसेविका शोभाबाई बारी, मंडळाचे अध्यक्ष यशवंत बारी, अर्जुन बुंधे, डॉ. राजेंद्र पायघन, राजस्थान येथील सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक भगवान बारी, डॉ. अरुण बारी यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

बारी समाज सर्वच क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहे. शैक्षणिक दृष्ट्या पाहता बारी समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि चांगल्या गुणांच्या आधारे यश मिळवित असून हि एक आनंदाची बाब असल्याचे मत महापौर नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले. तसेच, नगरसेविका शोभाबाई म्हणाल्या की, आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या वाढत असून हि एक गौरवाची बाब आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता बेरोजगारांना नोकऱ्या देणारे हात बनून उद्योगांकडे वळावे. निव्वळ नोकरीची आस न धरता विविध क्षेत्रात यश संपादन करण्याचे आवाहन शोभाबाई बारी यांनी केले.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेत देशात दुसरी आलेल्या कु. आयुषी राजेंद्र पायघन हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, यशवंत बारी, पूना बारी, सरला बारी,  अवधूत कोल्हे यांनी उपस्थितांचा रोपे देऊन सत्कार केला. प्रसंगी, ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी, भास्कर बारी, प्रकाश बारी आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १५ जणांनी रक्तदानाचा अधिकार बजावला. स्नेहल बारी, रोहित बारी, दर्शन बारी, प्राजक्ता कोल्हे, प्रीती ताडे, विजय बारी, नितीन बारी यांच्यासह आदी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बारी यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × four =