दक्षिण आफ्रिका दौरा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सर्वात लक्षवेधी ठरणार आहे तो एबी डीव्हिलियर्स. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि डीव्हिलियर्स हे चांगले मित्र आहे. कारण आयपीएलमध्ये ते एकाच संघातून खेळतात. कोहलीला डीव्हिलियर्सबद्दल आदर आहे. पण जेव्हा डीव्हिलियर्स प्रतिस्पर्धी म्हणून समोर असेल तर तो सर्वप्रथम संघाच्या रडारवर असेलअसे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

डीव्हिलियर्सला जानेवारी २०१६ साली दुखापत झाली होती. त्यानंतर गेल्या २३ महिन्यांमध्ये तो फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे.बॉक्सिंग डेला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यामध्ये डीव्हिलियर्स तब्बल दोन वर्षांनी खेळला होता. या सामन्यात संघाचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते. ‘‘डीव्हिलियर्स हा माझा चांगला मित्र आहे. तो एक चांगला फलंदाज आणि माणूसही आहे. त्याचा मी नेहमीच आदर करतो. पण मी भारताकडून खेळताना जेव्हा डीव्हिलियर्स प्रतिस्पर्धी असतो तेव्हा त्याला झटपट कसे बाद करता येईलयाचाच मी विचार करत असतो,’’ असे कोहलीने सांगितले.

संघाला जिंकण्याची भूक अधिक

जर तुम्ही एक संघ म्हणून मैदानात उतरता तेव्हा प्रत्येक खेळाडूला विजयात हातभार लावायचा असतो. आपल्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळावाअशी प्रत्येक खेळाडूची भावना असते. काही वेळा एखादा खेळाडू अशी काही अद्वितीय कामगिरी करतो कीत्याच्या एकटय़ाच्या जोरावरही संघ जिंकू शकतोपण जेव्हा २-३ खेळाडू विजयात मोलाचे योगदान देतात तेदेखील महत्त्वाचे असते. सध्याच्या घडीला भारतीय संघात प्रत्येक खेळाडूला जिंकण्याची भूक अधिक आहे. प्रत्येक जण संधीच्या शोधात असून संघासाठी ही चांगली गोष्ट आहेअसे कोहली म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =