मी नागपुरात येऊन संघ समाप्ती संमेलनाची घोषणा करणार असून संघाची संविधान (राज्यघटना) बदलण्याची इच्छा आहे. तुमच्यात दम असेल तर संविधान बदलूनच दाखवा आणि आम्ही संविधान वाचवून दाखवूअसे आव्हान गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप व संघ परिवाराला दिले. भाजप विरुद्ध गरिबी अशी लढाई २०१९ च्या निवडणुकीत असेल. फॅसिस्ट संघ परिवाराच्या या लढाईत पराभवासाठी जातधर्मपक्ष वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. कुणीही जिंकू दे पण भाजपचा पराभव झाला पाहिजे,असे ते म्हणाले.

रविवारी पुण्यात नव्या पेशवाईविरोधातला सांस्कृतिक एल्गार या नावाने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राधिका रोहित वेमुला यांनी कोरेगाव-भीमा (पुणे) येथील मराठेशाहीच्या कथित पराभवाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित या परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिग्नेश मेवाणी,मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अजहरीआदिवासी महिला नेत्या सोनी सोरी, ‘भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग,सर्वहारा आंदोलनाच्या उल्का महाजन, ‘जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिदमाजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.

काही संघटनांनी मी पुण्यात येऊ नये म्हणून इशारा दिला. मी त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या मोदी-शहाला घाबरलो नाही. गुजरातेत मोदींची ५६ इंची छाती फाडून ठेवली. तुम्ही तर अजून बच्चे’ आहात. जातधर्मभेद सोडून जनता शेतकरी’ व तरुण’ म्हणून पुढे येईल तेव्हा भाजपला २०१९ मध्ये दोनअंकी संख्यासुद्धा गाठू देणार नाही. मोदी ४ वर्षे विकासाच्या गप्पा मारतात. राम विरुद्ध हजचा अपप्रचार निवडणूक आल्यावर करतात. या नव्या पेशवाईविरुद्धचा लढा निवडणुकीतून लढता येणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेलअसे मेवाणी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − two =