दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी प्लॅन तयार

0
961

टुडे प्रवाह –  हल्ला करुन पळून जाणा-या दहशतवाद्यांना खिंडीत पकडून त्यांचा खात्मा करण्याचा एक आगळावेगळा विशेष प्लॅन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा विडा भारतीय सैन्याने उचलला आहे. त्यासाठी एक विशेष प्लॅन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीने तयार केला आहे. केंद्र सरकारकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. यासाठी अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

लष्कर, जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी स्थानिक लोकांचे साटेलोटे आहे आणि हिजबुलच्या अतिरेक्यांविरोधात मोहिमेसाठी हा प्लॅन बनवण्यात येत आहे दहशतवादी पळू शकतात मात्र वाचू शकत नाहीत, असा विश्वास त्यांनी मोदींना दिला. गेल्या काही दिवसात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत आहेत. हल्ल्याचं ग्राऊंड वर्क करणा-या हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांची माहिती मिळवली असल्याचं डोभाल यांनी यावेळी मोदींना सांगितले.

दहशतवाद्यांना शस्त्र पुरवणा-यांची माहिती मिळाली असून दहशतवादी ज्या मार्गांचा वापर पळण्यासाठी करतात, ते मार्गही कळले आहेत. त्यामुळे हल्ला करुन पळून जाणा-या दहशतवाद्यांना खिंडीत पकडून त्यांचा खात्मा करण्याचा प्लॅन केला असल्याचे डोभाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 9 =