भाजपमधील वाचाळवीरांनी गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे चित्र सध्या दिसत असून नरेंद्र सिंह तोमरनेपालसिंहबनवारीलाल सिंघल या नेत्यांच्या पाठोपाठ मुजफ्फरनगरमधील भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुजफ्फरनगरच्या खतौली मतदारसंघाचे विक्रम सैनी हे आमदार आहेत. सोमवारी नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले कीभारत हा हिंदूंचाच देश असून दाढीवाल्यांना येथे काही नालायक नेत्यांनी थांबवून ठेवले आहे. आपली जमीन आणि संपत्ती या लोकांनी बळकावली आहे. हे लोक आज आपल्या देशात नसते तर सर्वकाही हिंदूंना मिळाले असतेअसे विक्रम सैनी यांनी म्हटले.

समाजवादी पक्षालाही यावेळी सैनी यांनी लक्ष्य केले. विशिष्ट समुदायाच्याच लोकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजवादी पक्ष सत्तेत असताना मिळायचा. पण सबका साथसबका विकास’ या विचारसरणीनुसार भाजपचे सरकार काम करते. पक्षपातीपणे आणि विशिष्ट समुदायाला फायदा मिळवून देण्याच्यादृष्टीने यापूर्वीचे सरकार काम करत होते. जितकी लांब दाढी असेल तितकी मदत सरकारकडून मिळायचीअशी टीका सैनी यांनी केली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वाद तापण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + 20 =