नुबैरशाह शेखला राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

0
826

टुडे प्रवाह –  आंतरराष्ट्रीय मास्टर ठाण्याच्या नुबेरशाह शेखने नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत २० वर्षे गटात सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे या गटात नुबेरशाहने ग्रँडमास्टर आणि अव्वल सीडेड शार्दूल घागरे आणि सिद्धांत महापात्राला मागे टाकले.

नुबेरशाहने तीन विजय आणि दोन बरोबरी करताना जेतेपद मिळवले. निर्णायक सातव्या फेरीत नुबैरशाहने श्रीलंकेचा राष्ट्रीय विजेता डी. एम. संजुलाचा पराभव करत गुणसंख्येत शार्दुल घागरेशी बरोबरी साधली. दोघांचेही साडेपाच गुण झाल्याने सरस ‘टायब्रेक’च्या आधारावर नुबेरशाहला विजेता घोषित करण्यात आले.

इंडियन ऑईलची क्रीडा शिष्यवृत्ती मिळालेल्या नुबेरशाह राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पधेर्तील वरिष्ठ गटातही (ओपन) सहभागी झाला होता. या लढतीत स्पर्धेत सलग तिस-यांदा विजयी ठरलेल्या ग्रँडमास्टर अभिजित वर्माने त्याने बरोबरीत रोखले होते. बांगलादेशचा ग्रँडमास्टर झिया उर रेहमान आणि भारताचे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना बरोबरी करण्यास भाग पाडले होते. तसेच अरविंद चिदंबरमचा पराभव केला होता. स्पर्धेआधी २०व्या स्थानावर असलेल्या नुबेरशाहने चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठ गटात १५व्या क्रमांकावर झेप घेतली. नुबेरशाह हा साबू सिद्दिकी कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिस-या वर्षात शिकत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 6 =