ट्युडे प्रवाह  – वृक्ष तोडीतील गैरव्यवहार थांबविण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज, कार्यप्रणाली सदस्यांचे अधिकार यामध्ये सुस्पष्टता येण्यासाठी लवकरच महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे स्वतंत्र धोरण अंमलात येणार आहे. याबाबतचा सोमवारी वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या सदस्य शिल्पा भोसले यांनी याबाबत माहिती दिली.

सध्या शहरात विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. बांधकामांना अडसर ठरत असलेली वृक्ष रात्रीच्या वेळी उन्मळून पडण्याचेही प्रमाण वाढत आहे. वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याआधीच तोडल्याचा प्रकारही उघडकीला आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्याला बंदी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र असे असतानाही शहरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये यामध्ये वृक्ष प्राधिकरणाचे सर्वसमावेशक स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभाग यांचे कामकाज, अंदाजपत्रक, कार्यप्रणाली पूर्णपणे वेगळी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयामुळे उद्यान विभागाचा हस्तक्षेप वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजात होणार नाही. वृक्ष प्राधिकरणाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी सहा डिसेंबर रोजी खास बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 14 =