केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबाबत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे असून भाजप नेत्यांना बेताल विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याची सवय असल्यामुळे भाजपने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या हेगडे यांना समज द्यावीअशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मी संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आहे. आरक्षण संपुष्टात आणणार आणि संविधान मोदी सरकार बदलणारअसा अपप्रचार केला जात आहे. राज्यघटनेच्या पाठीशी पंतप्रधान मोदी ठामपणे उभे आहेतअसेही आठवले यांनी सांगितले.

आठवले म्हणालेकी संसदेत हेगडे यांच्या विधानावर खुलासा करण्यात आला असून संविधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान सरकार बदलेल ही भावना चुकीची असून हेगडे यांनी कदाचित हे विधान कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले असावे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल मात्र घटना बदलू दिली जाणार नाही.

००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + fourteen =