महाराष्ट्रासह देशभर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद उमटले असून भीमा कोरेगावच्या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदार धरले आहे. तर महाराष्ट्र सरकारवर बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी टीका केली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार रोखता आला असता. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना महाराष्ट्र सरकारने करायला हव्या होत्या. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आहे. भाजपराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जातीवादी संघटनांचा या हिंसाचारामागे हात असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × four =