शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भीमा-कोरेगाव हिसांचाराच्या घटनेमागे राजकीय षड्यंत्र असून त्यामुळेच उर्वरित महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले असल्याचा आरोप केला आहे. आज महाराष्ट्र जातीय रेषेमध्ये विभागला जात असून या सर्वामागे एक राजकीय षड्यंत्र असून असे जातीवरून राजकारण यापूर्वीच्या नेत्यांनी केले नसल्याचेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणालेमहाराष्ट्रातील हा हिंसाचार धक्कादायक आणि सर्वासाठीच ही चिंतेचे बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी अपराध्यांचा शोध घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच काही अदृश्य हात या घटनांमागे आहेत जे याचा राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करू इच्छितात आणि हे कोण आहेतयांचा शोध घेणे पंतप्रधानांचे कर्तव्य असल्याचे ही ते म्हणाले. कोरेगाव भीमा येथील विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 1 =