टुडे प्रवाह  – वाढत्या वाहनांमुळे होणारे वायु प्रदूषण कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथील नवी दिल्लीतील इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेच्या पुढाकाराने इथेनॉल निर्मितीला गती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) भोसरी येथे परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेत इथेनॉल निर्मितीवर चर्चा केली जाणार आहे. याबाबतची माहिती माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एनके पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. 20) दिली. यावेळी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल मुळे, सीआयआरटीचे राजेंद्र सगर पाटील, वसंतदादा शुगर फॅक्‍टरिज व संशोधन केंद्राचे महानिदेशक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकार मेक इनच्या माध्यमातून भर देत आहे. आज देशात सर्व प्रकारची वाहने व कंपन्यांसाठी 82 टक्के इंधन आयात केले जाते. त्यातील केवळ 18 टक्के इथेनॉलचा साठा भारताकडे शिल्लक आहे. दहा वर्षापूर्वी दिवसाला 75 हजार दुचाकी तयार होत होत्या. आज रोजी एक कंपनी 3 लाख दुचाक्‍या दिवसाला विक्री करते. या वाढत्या वाहनांची संख्या विचारात घेता 18 टक्के इथेनॉलचा स्टॉक पुढील दहा वर्षात संपणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मित वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या परिषदेत कारखानदार, वाहन कंपन्या, इथेनॉल निर्मिती संस्था त्याचबरोबर शेतकरी वर्गाची मदत घेऊन इंधन निर्मिती वाढविण्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, विद्युत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × two =