केंद्रातील मोदी सरकारने राजकीय पक्षांना निधी देण्यासाठीव्याजमुक्त निवडणूक मुद्रांकाची घोषणा केली असून हे मुद्रांक जानेवारीएप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये भारतीय स्टेट बँकेमधून खरेदी करता येऊ शकतात. या निवडणूक मुद्रांकांवर व्यक्तीचे नाव नसेल.

फक्त अधिकृत बँक खात्यातून या मुद्रांकांचे १५ दिवसांच्या रोखीत रुपांतर करता येऊ शकते. १,००० रुएक लाख रु१० लाख रुपये व एक कोटी रुपयांच्या किंमतीत निवडणूक मुद्रांक उपलब्ध असतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली.

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल समजले जात आहे. जेटली यांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाच्या संकल्पात निवडणूक मुद्रांकाची योजना जाहीर केली होती. जेटली यांनी सांगितले कीराजकीय पक्षांना सध्याच्या काळात जास्तीतजास्त निधी हा रोख स्वरुपात मिळतो. या व्यवहारात पारदर्शकता नसल्यात जमा असतेपरंतु आता यात निवडणूक मुद्रांकामुळे अधिक पारदर्शकता येईल. या मुद्रांकांचा लाभ ज्या नोंदणीकृत राजकीय पक्षांनामागील निवडणुकीत कमीतकमी एक टक्के मते मिळाली आहेत त्यांना घेता येणार आहेअसे जेटली यांनी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =