यूपी-बिहारींना रोखण्यासाठी राज ठाकरेंना साकडे

0
665
टुडे प्रवाह – यूपी-बिहारमधील नागरिकांचा लोंढा रोखण्यासाठी आसाममधील ‘स्वाधीन नारी शक्ती’ या महिला संघटनेच्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ येथे भेट घेतली.

या महिला शिष्टमंडळाने भेट घेऊन आसाममध्येही यूपी-बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची समस्या मांडली. तसेच या समस्येवर मार्गदर्शन करण्याची विनंती राज ठाकरे यांना केली.

महाराष्ट्राप्रमाणेच आसाममध्येही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे तेथील भूमिपुत्रांच्या नोक-यांवर गदा येत आहे. त्यामुळे यूपी-बिहारच्या नागरिकांचा लोंढा कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या महिलांनी राज ठाकरेंना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी या महिलांनी राज ठाकरेंना राखीही बांधली. तसेच सप्टेंबर महिन्यात आसामला भेट देऊन ‘आसाम बचाओ आंदोलना’ला पाठिंबा द्यावा व मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली.

महाराष्ट्रात गेली ११ वर्षे राज ठाकरे मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगारावरील मराठी माणसाच्या न्याय-हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. या प्रश्नावर राज हेच नेतृत्व आणि मार्गदर्शन देऊ शकतात याची खात्री आम्हाला वाटत असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 5 =