टुडे प्रवाह – महापालिकेच्या वतीने रविवार 26 नोव्हेंबर रोजी माजी महापौर कै. सादबा उर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चऱ्होली गाव, मोशी फाटा देहू – आळंदी रोड डुडुळगाव मार्गे चिखली – कुदळवाडी स्पाईन रोड, वैष्णव माता चौक, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर अशी ही स्पर्धा होईल.
पुरूष गटातील 21 किमीमध्ये चऱ्होली गाव ते संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर येथे तर महिला गट 10 किलोमीटरमधील चऱ्होली गाव ते संत प्रियदर्शनी स्कूल मोशी चिखली रोडपर्यंत स्पर्धा आहे. 18 वर्षे मुले शालेय गट सहा किमीमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलापर्यंत आहे. 16 वर्षे मुले व मुली शालेय गट चार किलोमीटर मधील व 18 वर्षे मुली शालेय गट सहा किलोमीटर मधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे. तसेच14 वर्षे मुले व मुली शालेय गटातील 3 किमी ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे आहे.