राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत शुभम सानपला सुवर्ण

0
94

ट्युडे प्रवाह –  राज्यस्तरीय आंतरशालेय किक बॉक्सींग स्पर्धेत भोसरी इंद्रायणीनगरमधील प्रियदर्शनी इंग्लीश मिडीयम स्कूलच्या दहावी वर्गातील विद्यार्थी शुभम सानप याने सुवर्णपदक पटकाविले. तर, आठवी वर्गातील साहिल यादव याने रौप्यपदक मिळविले. अलिबाग जि.रायगड येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी ही कामगीरी केली.

सुवर्ण पदकाच्या कामगीरीनंतर छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी शुभम सानपची निवड करण्यात आली आहे. शुभम आणि साहिल यांना क्रीडा शिक्षक प्रकाश बोइनवाड, सचिन जरे, लक्ष्मण फुके,  उमेश कोळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इस्टीट्युटचे अध्यक्ष इंद्रमान सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग, व्यवस्थापन अधिकारी नरेंद्र सिंग, प्राचार्या अर्पिता एस आणि डॉ. गायत्री जाधव यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =