भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदला राजधानी मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरात सुरुवात झाली असून आंदोलकांनी ठाण्यात रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर उतरून सुमारे १० मिनिटे लोकल रोखून धरली. तसेच मुंबईच्या चेंबुर नाका परिसरात स्कूल बसची तोडफोड करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. या बंदला महाराष्ट्र लोकशाही आघाडीडावी लोकशाही आघाडीसंभाजी ब्रिगेड यांसह अडीचशेहून आधिक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याने डबेवाल्यांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही भिमा-कोरेगाव घटनेच्या पडसादानंतर बंद पुकारण्यात आला आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार झाल्याने जेवणाचे डबे चाकरमान्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे डब्यांचा काही उपयोग होत नाहीत्यामुळे आज मुंबईत जेवणाचे डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =