टुडे प्रवाह –

अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

 

 

पक्षाने दिलेली पदे ही कामासाठी आहेत, ती लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी आणि सत्कार घेण्यासाठी नाहीत, कामाकडे दुर्लक्ष केल्यास पदे काढूनही घेऊ. केवळ जागा अडवणारे पदाधिकारी राष्ट्रवादीला नको अशी तंबी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे कार्यकर्त्यांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते सातारा येथे बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.  पवार म्हणाले, की राष्ट्रवादीने दिलेल्या पदांच्या माध्यमातून सामूहिक कार्य दिसायला हवे. राष्ट्रवादीची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पदे दिली आहेत. ती लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी आणि सत्कार घेण्यासाठी नाहीत, कामाकडे दुर्लक्ष केल्यास पदे काढूनही घेऊ. केवळ जागा अडवणारे पदाधिकारी राष्ट्रवादीला नको असल्याची तंबी त्यांनी दिली.  कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्याकडून चांगली उमेद  पाहायला मिळाली. आता, वक्ता प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचे शिबिरही लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 5 =