प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होऊ शकला नसला तरी हा सत्कार या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. शरद पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती असल्याचे मिश्किल उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढल्यामुळे अनेकांच्या भुवया शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने उंचावल्या होत्या.

पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. पण हाच त्यांचा होकार आहे असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी मी त्यांच्याच करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथसंकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटीलसुशीलकुमार शिंदेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यावेळी म्हणालेअनेक महत्वाच्या पदांवर प्रतिभाताई पाटील यांनी देखील कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्रफक्त त्यांचे मुख्यमंत्री या एका पदावर काम करायचे राहून गेले. हे पद त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे काम मी केलेअसे ते मजेत म्हणाले.

०००००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =