छावा संघटनेचे सिनेमागृहांना निवेदन

 टुडे प्रवाह  –  शहरातील सिनेमागृहात “दशक्रिया’ हा चित्रपट अद्याप सुरु केलेला नाही. काही संघटनाच्या विरोधामुळे हा चित्रपट सिनेमागृहात झळकलेला नाही. त्यामुळे हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सिनेमागृह चालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यभर “दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटास सेन्सॉर बोर्ड व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संघटनांचा विरोध न जुमानता हा चित्रपट तत्काळ सिनेमागृहात सुरु करावा, तसेच “दशक्रिया’ चित्रपटास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पुर्ण संरक्षण देण्यात येईल, असे शहराध्यक्ष गणेश जाधव, अजय लखणे, सुशांत दुणगे, बलभीम जगदाळे, विशाल लेंडवे, राहूल माने यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 7 =