शास्त्री यांची भरत अरुण यांच्यासाठी ‘बॅटिंग’

0
1293

टुडे प्रवाह –  नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण यांना पसंती दर्शवली आहे. मध्यमगती गोलंदाज झहीर खानला सल्लागार म्हणून नेमावे, असे त्यांना वाटते. आपल्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ असावा, असे शास्त्री यांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने त्यांनी बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

झहीरची गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचे शास्त्री यांचे म्हणणे आहे. अन्य माजी क्रिकेटपटूप्रमाणे झहीर हा संघासाठी २५० दिवस देऊ शकणार नाही, असे त्यांना वाटते. भरत अरुण यांचे गोलंदाजी प्रशिक्षकाचे योगदान मोलाचे आहे. आजवर प्रत्येक मुख्य प्रशिक्षकाने त्यांची प्रशंसा केली आहे. शास्त्री हे टीम डायरेक्टर असताना अरुण हेच गोलंदाजी प्रशिक्षक होते. शास्त्री यांनी बी. अरुण यांच्यासाठी ‘बॅटिंग’ केल्यामुळे झहीरच्या नियुक्तीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

झहीरला गेल्या वर्षी गोलंदाजी प्रशिक्षक बनायचे होते. मात्र त्याचे चार कोटी रुपयांचे मानधन बीसीसीआयला मान्य नव्हते. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने मंगळवारी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खान तसेच महत्त्वपूर्ण दौ-यांसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या नावाची घोषणा केली.

झहीरची निवडही विशिष्ट दौ-यांपुरती’
नवी दिल्ली : माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खानची गोलंदाजी प्रशिक्षकपदी झालेली निवड ही राहुल द्रविडप्रमाणेच विशिष्ट दौ-यांपुरती आहे, असे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले. झहीर आणि द्रविड यांच्या नियुक्तीपूर्वी रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्याचेही बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − three =