टुडे प्रवाह – राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्यातर्फे सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा परीक्षेत शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या बारी हिने देशातून पहिल्या क्रमांकाने येण्याचा मान मिळविला आहे. दिव्या हिच्या या यशाबद्दल देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच, पुढील वाटचालीसाठी बारी समाजातील विविध व्हॉटस्‍ ॲप ग्रूप आणि फेस बुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देण्यात येत आहे.

परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे परीक्षा अधिकारी छत्रपाल दांबर्डे यांचे पत्र बारी समाज माध्यमिक विद्यालयाला नुकतेच प्राप्त झाले आहे. दरम्यान, समितीतर्फे दीक्षांत समारोह रविवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिमापूर (नागालँड) येथे आयोजित केला आहे. या ठिकाणी दिव्या हिचा सन्मान करण्यात येणार आहे. तिला मुख्याध्यापक एस.पी.पाटील यांच्यासह हिंदी विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + 1 =