टुडे प्रवाह – प्रभाग 17 मधिल शिवनगरी परिसरामध्ये पाण्याच्या नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली असून नगरसेवक नामदेव ढाके यांनी बुधवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केली. तसेच, या भागातून टाकण्यात येत असलेल्या पाईप लाईनची अधिकाऱ्यांकडून माहिती घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या.

यावेळी, महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कानडे, भाजपा कामगार आघाडीचे शहर उपाध्यक्ष शंकर पाटील, किसन भोळे, सामाजिक कार्यकर्ते योगेश महाजन, वसंत नारखेडे, नितेश गवई, मनोज ढाके, पंढरीनाथ संकपाळ आदी उपस्थित होते.

दरम्यान, नगरसेवक नामदेव ढाके यांनी स्थानिक नागरिकांशी समस्यांविषयी चर्चा केली. तसेच, त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. शिवनगरी परिसरात नव्याने टाकण्यात येत असलेल्या पाण्याच्या पाईप लाईनमुळे या भागात सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचे नगरसेवक ढाके यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × two =