२०१७सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली असून विशेष म्हणजे या संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला स्थान मिळालेले नाही.

या एकदिवसीय संघामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या २ आणि इंग्लंडच्या ३ खेळाडूंना स्थान दिले आहे. या संघात पाकिस्तानन्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील १-१ खेळाडूला स्थान मिळाले असून भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्माविराट कोहली आणि हार्दिक पंड्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

संघाचा कर्णधार विराट कोहलीला बनवण्यात आला आहे. २०१७ मध्ये २६ पैकी १९ सामन्यांमध्ये कोहलीने विजय मिळवला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि क्विंटन डी. कॉकला निवडण्यात आले आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६ शतक आणि पाच अर्धशतकांसह १२९३ धावा केल्या.

असा आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (भारत)क्विंटन डी कॉक (द अफ्रिका)विराट कोहली (कर्णधार,भारत)जो रूट (इंग्लंड)एबी डिव्हिलियर्स (द आफ्रिका)बेन स्टोक्स (इंग्लंड)हार्दिक पंड्या (भारत)लियाम प्लंकेट (इंग्लंड)ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)हसन अली (पाकिस्तान)रशीद खान (अफगाणिस्तान).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 15 =