सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली रेल्वे धावली

0
1311

  टुडे प्रवाह | सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर चालणारी भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे देशातील रूळांवरू आज धावली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या स्पेशल डीईएमयू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेमध्ये एकूण १० कोच आहेत. याच्या आठ कोचच्या छतावर १६ सोलर पॅनल बसवलेले आहेत.

सुर्याच्या ऊर्जेमुळे या गाडीच्या छतावर लावलेल्या सोलर पॅनलमधून ३०० वॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोचमध्ये बसवलेला बॅटरी चार्ज होणार आहे. याद्वारे या रेल्वेतील सर्व दिवे, पंखे आणि माहिती यंत्रणा चालणार आहे. रेल्वेच्या माहितीनुसार ही रेल्वे प्रत्येक वर्षी २१ हजार लीटर डीझेलची बचत करणार आहे. पुढच्या सहा महिन्यांत अशा आणखी २४ कोच वाढवण्यात येणार आहेत.

रेल्वे मंत्री प्रभू म्हणाले, भारतीय रेल्वेला इकोफ्रेंडली बनवण्यासाठी ही मोठी झेप आहे. ऊर्जेच्या आपारंपारिक स्त्रोतांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत. बऱ्याचदा डीईएमयू रेल्वे गाड्या या मल्टिपल युनिट रेल्वे असतात ज्यांना इंजिनाच्या मार्फत ऊर्जा मिळत असते. यासाठी इंजिनमध्ये स्वतंत्रपणे डीझेलचे जनरेटर लावावे लागतात. मात्र आता याची गरज भासणार नाही.

ही रेल्वे दिल्ली विभागाच्या आसपासच्या शहरांमध्येच चालणार आहे. या रेल्वेसाठी अद्याप नवे मार्ग आणि प्रवास भाडे ही ठरवण्यात आलेले नाही. १६०० हॉर्स पॉवर वाली ही रेल्वे चेन्नईच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. तर इंडियन रेल्वे ऑर्गनायजेशन ऑफ अल्टरनेटिव फ्यूअल या संस्थेने यासाठी सोलर पॅनल बनवले आहे. पुढील २५ वर्षांची या सोलर सिस्टीमची वॉरंटी असणार आहे. या दरम्यान, ही रेल्वे केवळ पर्यावरणाचेच रक्षण करणार नाही तर लाखो रूपयांचे डीझेलही वाचवणार आहे. या रेल्वेच्या निर्मितीसाठी १३.५४ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. एका प्रवासी कोचची किंमत सुमारे १ कोटी रूपये आहे. या रेल्वेतील एका कोचमधून ८९ लोक प्रवास करू शकतात. रेल्वेने असाही दावा केला आहे की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही रेल्वे अनेक दिवस चालू शकते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =