हवामान खात्याविरोधात गुन्हा दाखल ; पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्याचा आरोप

0
1059

टुडे प्रवाह – पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाखोंचे नुकसान झाल्याचा आरोप करत भारतीय हवामान खात्याविरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बियाणे आणि किटकनाशक उत्पादक कंपन्यांशी हवामान खात्यानं संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी या तक्रारीत केला आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंडरुड येथील पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी हवामान खात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाच्या आधारावर पेरणी केली. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यातील आनंदगाव येथील ५४ वर्षीय गंगाभीषण तावडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावर्षी जूनमध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिली. हवामान खात्याने शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे, असा आरोप तावडे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस काही पडला नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले, असेही त्यांनी सांगितलं. या परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी केली जाते. जून-जुलैमध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. शेतकऱ्यांनी या माहितीच्या आधारावर बियाणे, खते, किटकनाशके आणि मजुरांवर लाखो रुपये खर्च केले. पण पाऊस न पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असेही त्यांनी सांगितलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × one =